35th Anniversary Celebration : At Alandi, Dist: Pune
निर्मितीची पार्श्वभूमी
महाराष्ट्र ही संत आणि समाजसुधारकांची भूमी मानली जाते. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या संत परंपरा संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांकडून २० व्या शतकापर्यंत पोहोचल्या आहेत. लोकहितवादी ते प्रबोधनकार ठाकरे अशी दीडशे वर्षांची समाजसुधारकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्रालाही लाभली आहे. या दोन्ही परंपरांनी अनिष्ट रूढी, परंपरा, कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा यांच्या चिखलातून भारतीय जनतेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. समाजहितासाठी धर्माची समीक्षा आणि चिकित्सा करताना या संतांनी त्यातील शोषण आणि कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी तार्किकता, बुद्धिवाद, सुधारणावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादाचा प्रचार केला. महाराष्ट्रात फुले - शाहू - आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाची एवढी प्रदीर्घ परंपरा असूनही महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि धर्मांधता मोठ्या वेगाने फोफावत आहे.
याच पार्श्वभूमीवर शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी ९ ऑगस्ट १९८९ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ध्येयविधान:
भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाधिष्ठीत आणि शोषणमुक्त समाज साकार करण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन करणे हे महा. अंनिसचे प्रमुख ध्येय राहील त्यासाठी-
-
विवेकनिष्ठता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे अंधश्रद्धांचे निर्मूलन, शाश्वत नैतिक मूल्यांचा अंगीकार, प्रचार व प्रसार.
-
संविधानात उद्धृत उपासना स्वातंत्र्याचा आदर करून देव-धर्मनिरपेक्ष आणि विवेकावर आधारित नैतिक जगण्याच्या अधिकाराचा आग्रह आणि मानवी व्यवहार, रूढी, परंपरा व श्रद्धा यांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य.
-
जात, धर्म, लिंग व वंश या परंपरागत भेदांच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष, समताधिष्ठित व मानवतावादी वर्तनासाठी स्त्री-पुरुष, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इत्यादींच्या समतेचा आग्रह.
-
विद्वेष आणि अन्यायाला विरोध करून देणाऱ्या आणि समाजातील वंचित व गरिबांना योग्य न्याय व सन्माननीयरित्या जगण्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या धोरणांचे समर्थन.
-
श्रमप्रतिष्ठा व पर्यावरण स्नेही जीवनशैली याच्या अंगीकारातून चंगळवादाला नकार आणि पृथ्वी व त्यावरील जैवविविधतेचे संरक्षण-संवर्धन करण्याची जबाबदारी.
-
भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिकेतून प्रजासत्ताक व्यवस्थेत विवेक विचार संघटित व सक्रिय करणे आणि त्यातून जबाबदार नागरिकत्वाचा विकास करून लोकशाही सुदृढ करणे
या सर्व उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी विचारमंथन, प्रबोधन व विधायक कृतीद्वारे मूल्याधारित नैतिक समाज उभारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कटिबद्ध राहील.
या ध्येयविधानाच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबाजवणीसाठी संघटनेने पाच सूत्रे (पंच-सूत्री) निश्चित केली आहेत, ती पुढील प्रमाणे:
१) शोषण, फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या सर्व धर्मांतील अंधश्रद्धांना विरोध करणे.
२) वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे.
३) धर्माची विधायक चिकित्सा करणे आणि रचनात्मक, कालसुसंगत पर्याय सुचवणे.
४) संत आणि समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानातील मूल्ये सक्रिय करणे.
५) व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे.
ही पंचसूत्री संस्थेच्या विचार आणि कार्याचा पाया आहे.

तुम्ही अशा प्रकारे मदत करू शकता
महा. अंनिसच्या कार्याला आपण अनेक मार्गांनी पाठबळ देऊ शकता. आपल्या शहरांत, गावांत सर्वत्र हे कार्य वाढत जावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही महा. अंनिसचे सदस्य बनू शकता, उपक्रमांसाठी तुमचा वेळ देऊ शकता किंवा हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठि मदत म्हणून देणगी देऊ शकता. अधिक जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.


नवीन घडामोडींविषयी माहिती घ्या
10
राष्ट्रीय अधिवेशने
८३
संघटना
125
कार्यक्रम आयोजित


अंधश्रद्धा निर्मूलनाचे इतर कोणते उपक्रम आहेत, ज्यात तुम्ही सहभागी होऊ शकता?
-
अंधश्रद्धा निर्मूलनावरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही ती पुस्तके खरेदी करू शकता.
-
तुम्ही 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या महा. अंनिसच्या अधिकृत मराठी मासिकाचे वर्गणीदार बनू शकता.
-
आपण देणगी देऊन किंवा मासिकात जाहिराती देऊन या कार्यास मदत करू शकता.
-
तुम्ही तुमच्या ओळखीच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करू शकता (जसे की शाळा, महाविद्यालये, महिला संस्था, युवा संघटना, गावे, वाड्या).
-
तुम्ही स्वतः अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
-
तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवू शकता, जे या विचारांनी प्रेरित आहेत या कार्यात सहभागी होऊ इच्छितात.
-
तुमच्या महितीतल्या ठिकाणी तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा आयोजित करू शकता.

चळवळीत सामील व्हा!
ताज्या बातम्या आणि अपडेट्स मिळवा