आम्ही काय करतो
संघटनेच्या नावात असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे संघटनेचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. परंतु संघटनेच्या स्थापनेपासून गोवा व कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी संघटनेचे काम आहे. संघटनेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समन्वय विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब अशा अनेक राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन स्वरूपाचे अथवा समांतर काम करणाऱ्या संघटनांच्या व संस्थांच्या संपर्कात ही संघटना असते. या संस्था- संघटनांशी वैचारिक आणि कार्याच्या माहितीचे आदानप्रदान होत असते. पर राज्यामध्ये मार्गदर्शक आणि प्रबोधनाच्या भूमिकेतून संघटना सहकार्य करीत आहे. महा. अंनिसचे विविध क्षेत्रात कार्य करणारे विभाग पुढील प्रमाणे आहेत:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्षेत्र

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या संघटनेकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यातूनच युगांडा मध्ये नरबळी विरोधात कायदा करण्यात त्या देशाला सल्ला देण्यात आला. तसेच युनोच्या शाखेत काही निवडक जागतिक संघटनांनी डाकीण प्रथेच्या विरोधात ठराव मांडला होता, आणि तो पारित झाला होता. त्या जागतिक संघटनांमध्ये महा. अंनिस ही सुद्धा एक संघटना आहे.
अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामात अजून कोण कोणत्या प्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता ?
१) अंधश्रध्दा निर्मूलनावर आधारित अनेक पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती तुम्ही खरेदी करू शकता.
२) संघटनेच्या 'अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिका' या मासिकाचे तुम्ही वर्गणीदार होऊ शकता.
३) या कामास आर्थिक देणगी देऊन तुम्ही मदत करू शकता.
४) आपल्या परिचित संपर्काच्या ठिकाणी (जसे शाळा, महाविद्यालय, महिला मंडळे, युवक मंडळे, गाव, पाडे, वस्ती) तुम्ही अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करु शकता.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूर्लन समिती
५) अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहून सहभाग नोंदवू शकता.
६) या विचारांना मानणारे, तुमचे कोणी मित्र, नातेवाईक असतील तर त्यांच्यापर्यंत हे प्रचार पत्रक पोहोचवून त्यांना कामात सहभागी होण्यास सांगू शकता.
७) आपल्या परिचित ठिकाणी आपण अंधश्रध्दा निर्मूलन प्रशिक्षण शिबीर लावू शकता
Our Divisions
-
Anati Fake-Godmen Division
-
Various Campaigns Division
-
Scientific Awareness Education Project
-
Women Participation Division
-
Publication and Distribution Division
-
Youth Participation Division
-
Psychological Health Management Division
-
Scientific Awareness Vehicle Project
-
Cultural Expression Division
-
Social Media Division
-
Training Division
-
National and International Division
-
Funds Management Division
-
Legal Management Division
-
Office Management Division
-
Abolition of Caste Division
-
Caste Panchayat Burrial Campaign
-
Inter-Caste, Inter Religion, Satyashodhak Marriage
-
Rational Selection of Partner
-
House Magazine Division
-
Andhshraddha Nirmulan Patrika
-
Thought with Action
-
Vichar Kruti Patrika