top of page

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

जीवनपट

नाव - डॉ.नरेंद्र अच्युत दाभोलकर

जन्मतारीख – ०१ / ११ / १९४५

शिक्षण – एम.बी.बी.एस. ( १९७० )

वैद्यकीय व्यवसाय – १९७० ते १९८२

संस्थापक – समाजवादी युवक दल, सातारा ( १९७५ )

सदस्य – समता आंदोलन महाराष्ट्र ( १९८२ ते १९८५ )

1695990770270.jpg

● १९७० साली पदवी मिळाल्यानंतर १२ वर्ष वैद्यकीय व्यवसाय.

● १९८२ सालापासून चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता.

● 'एक गाव एक पाणवठा नामांतर' इ. चळवळींत सक्रिय सहभाग.

● १९८२ सालापासून मृत्यूपर्यन्त अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य.

● अंधश्रद्धेच्या सर्व प्रकारांविरोधात प्रबोधन, रचना व संघर्ष या तीनही मार्गांनी सतत कार्यरत.

● अंधश्रद्धा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद या विषयावर १२ पुस्तकांचे लिखाण. त्यांच्या अनेक आवृत्ती

● १९८९ साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना. सलग २० वर्ष त्याचे कार्याध्यक्षपद भूषविले.

● अंधश्रद्धा निर्मूलन तसेच मानसिक आरोग्य, विवेकी जीवनशैली याबाबत हजारो व्याख्याने. शेकडो लेख, आकाशवाणी व टीव्ही चॅनल्स यामधून असंख्य कार्यक्रमात सहभाग.

● साधना या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साप्ताहिकाचे १६ वर्ष संपादक

● साधना साप्ताहिक ज्या मार्फत प्रकाशित होते त्या साधना ट्रस्टचे सचिव.

● १९८९ साली सातारा येथे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना. व्यसन हा एक मानसिक आजार आहे. याबाबत व्यापक प्रबोधन तसेच व्यसनाविरुद्ध प्रतिबंध, प्रतिकार व उपचार यांत ठाम.

● पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या सामाजिक कृतज्ञता निधी यांचे संस्थापक व तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत कार्यवाह.

● कबड्डी या खेळाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू भारत देशाकडून बांगलादेशाविरुद्ध कबड्डी कसोटी सामने खेळण्यासाठी निवड.​

 

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य -

  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व सलग २१ वर्ष कार्याध्यक्ष या नात्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे काम संपूर्ण महाराष्ट्रात झाले, त्यामध्ये डॉक्टर दाभोळकर प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात सहभागी होते. अर्थात एकूण कार्याचे स्वरूप व्यापक असल्याने संघटनेतील सहकाऱ्यांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग होताच. या कामाचा आढावा.

  • १- १९८२ साली स्वतःचे दोन दवाखाने व हॉस्पिटल बंद करून चळवळीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता. गेली ३० वर्षे हे काम अखंडपणे चालू आहे. या कालावधीत संघटनेकडून त्यांनी कसलेही मानधन घेतले नाही. प्रत्येक महिन्यातील सुमारे २० ते २२ दिवस संघटनेच्या कामासाठी भ्रमंती गेली ३० वर्षे चालू होती.

  • २- या कालावधीत किमान ३ हजार व्याख्याने यांनी दिली. या व्याख्यानांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन विवेकवाद, धर्मनिरपेक्षता अशा सर्व विषयांचा समावेश होता.

  • ३- वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. ती मान्यवर प्रकाशकांनी प्रसिद्ध केली. त्यांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. पुस्तकांची नावे अशी -  भ्रम आणि निरास, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, विचार तर कराल, श्रद्धा - अंधश्रद्धा, ठरलं डोळस व्हायचं, ऐसे कैसे झाले भोंदू, लढे अंधश्रद्धेचे भाग - १, २, ३, विवेकाची पताका घेऊन खांद्यावरती, तिमिरातून तेजाकडे - अंधश्रद्धा निर्मूलनाचे समग्र आकलन.

  • ४- महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख वृत्तपत्रांत गेल्या ३० वर्षात शेकडोलेख प्रसिद्ध झाले आहेत.

  • ५- अंधश्रद्धेशी संबंधित अनेक विषयांबाबत स्वतंत्रपणे वा संयुक्तपणे विविध चॅनल्सवर अनेक मुलाखती व कार्यक्रम झाले.

  • ६- प्रमुख १० भाषणांची एक एमपी-२ ऑडिओ सीडी निघाली आहे.

  • ७- वृत्तपत्रांतून असंख्य बातम्या आलेल्या आहेत. विविध स्वरूपाची बुवाबाजी, भानामती, चमत्कार, अनिष्ट रूढी-परंपरा यांच्याशी तीव्र संघर्ष, यात्रेतील पशुहत्या रोखणे, जात- हुंडा- पुरोहित- मुहूर्त- खर्च या बाबींना फाटा देऊन सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावणे, पर्यावरण सुसंगत होळी, प्रदूषणमुक्त दिवाळी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी होणारे प्रदूषण रोखणे अशा धर्म चिकित्सेच्या अनेक संघर्षातही मोठ्या प्रमाणात सहभाग व नेतृत्व.

  • प्राप्त पुरस्कार-

  • १- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व शिवछत्रपती युवा पुरस्कार हे राज्यपातळीवरील दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारी एकमेव व्यक्ती.

  • २- पुस्तक लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा एकूण तीन वेळा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, ऐसे कैसे झाले भोंदू व अंधश्रद्धा विनाशाय या पुस्तकांना.) याशिवाय विविध मान्यवर संस्थेचे पुरस्कार.

  • ३- अनेक सामाजिक संस्थांकडून सन्मानपत्र.

  • ४- महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका यांच्यामार्फत न्यू जर्सी येथे दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा १० लाखांचा पुरस्कार मिळाला. हे पैसे दाभोलकरांनी समितीला दिले.

  • ५- २०१४ भारत सरकारद्वारा मरणोत्तर "पद्मश्री" पुरस्कार.

एक महान नेते म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे प्रमुख गुण:

* एक चांगले नेते, प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संबंध होते.

* त्यांनी आयुष्यभर साधे राहणीमान पाळले.
* ते सहसा तुलनेने स्वस्त राज्य परिवहन बसने प्रवास करायचे; दौर्‍यावर असताना हॉटेलमध्ये न राहता  आणि असताना कार्यकर्त्यांच्या घरी राहणे पसंत करायचे.

* कार्यकर्त्यांच्या विविध क्षमतांना चालना देणारे आणि समाजासाठी सर्वोत्तम देण्यास सर्वांना प्रोत्साहित करणारे एक उत्तम प्रेरक.

* योग्य वेळी संघटनेसाठी उत्तराधिकारी नियोजन करण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानुसार, त्यांनी संघटनेत दुसऱ्या फळीतील तरुण नेतृत्व निर्माण केले आणि जून २० मध्ये तरुण पात्र पिढी श्री. अविनाश पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

bottom of page